जुन्या चाकोरीत फसलेली मनोवृत्ती
ज्या विज्ञानाने मानवी जीवन आमूलाग्र बदलले, भारत-चीन यांसारख्या प्राचीन व आपल्या चाकोरीत शतकानुशतके चालत असलेल्या संस्कृतींना त्या चाकोरीतून काढून, एका अनोळखी व बिकट मार्गाला लावले, त्या विज्ञानाच्या अभ्यासाला सध्या सर्व शिक्षण-संस्थात अतोनात महत्व आलेले आहे. या शाखांना प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी कठोर परिश्रम करतात. मुलांनी (व मुलींनीसुद्धा) विज्ञानशाखेला जावे ही पालकांचीही महत्त्वाकांक्षा असते. विज्ञानाच्या लोकप्रियतेचे कारण …